आनंदघन भुवनी ।
भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी निधन झाले. त्या निमित्त त्यांच्यावर केलेले काव्य येथे देत आहोत.
स्वर्गीची गंधर्वतनया हिंदुस्थानी प्रकटली ।
सुरांस तुळणा नाही आनंदघन भुवनी ।। १ ।।
विश्वात पोचली तान, तृप्त झाले नेत्र नि कान ।
योगदान ऐसे दिधले आनंदघन भुवनी ।। २ ।।
येथूनी गायिले गान, जागतिक ऐसे झाले ।
संतोष बहु जाहला आनंदघन भुवनी ।। ३ ।।
श्रोत्यांसी जिंकले ऐसे, आताही तृप्तवी पहा ।
रसिकांनी दिधले प्रेम आनंदघन भुवनी ।। ४ ।।
उदंड ऐकती सवे, ते ते सर्वत्र गाती ।
सामर्थ्य कैचे सांगावे आनंदघन भुवनी ।। ५ ।।
उदंड गायिली गीते, रसिकांसी रमवाया ।
ताल, सूर, लय जपे आनंदघन भुवनी ।। ६ ।।
बुडाले सर्वही ज्याचे, खचला ऐसा कुणी ।
नैराश्याचा क्षय हो झाला आनंदघन भुवनी ।। ७ ।।
गुणांची ऐसी खाण, भारतरत्नाचा मिळे मान ।
ही भारतभूची शान आनंदघन भुवनी ।। ८ ।।
परि येईल पुन्हा परतूनी अपुल्या भारतभूवर ।
आनंद मावणार ना मनी, आनंदतील जन भुवनी ।। ९ ।।
– सौ. श्रावणी फाटक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.२.२०२२)