सांगली येथे ‘मारुति सुझुकी नेक्सा’ आस्थापनास स्टेडियम भाड्याने देणार्या महापालिका आयुक्तांच्या विरोधात निषेध आंदोलन !
सांगली, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – खेळाडूंची हानी आणि त्यांचा सराव बंद करून, तसेच अवैध पद्धतीने ‘मारुति सुझुकी नेक्सा’ या आस्थापनास सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम भाड्याने दिले आहे. राष्ट्रीय स्पर्धा जवळ आल्या असून स्टेडियम भाड्याने दिल्याने अनेक खेळाडूंचा सराव थांबलेला आहे. तरी ८ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ‘मारुति सुझुकी’ आस्थापनास भाड्याने देणार्या आयुक्तांच्या विरोधात भाजप आणि खेळाडू यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजप संघटन सरचिटणीस दीपक माने, प्रियानंद कांबळे, राहुल माने, सचिन ओमासे, अमित भोसले यांसह अन्य उपस्थित होते.