(म्हणे) ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रथम मतदान करा आणि नंतर प्रेम करा !’
निवडणूक आयोगाची ‘कू ॲप’वर विशेष मोहीम
१४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही फोफावली आहे. पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली आणलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. याला निवडणूक आयोगाने प्रोत्साहन देणे कितपत योग्य आहे ? – संपादक
पणजी – गोव्यात १४ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेची निवडणूक होत आहे.
या दिवशी अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी निवडणूक आयोगाने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी ‘प्रथम मतदान करा आणि नंतर प्रेम करा’ या आशयाची एक मोहिम निवडणूक आयोगाच्या ‘कू ॲप’वरून राबवली आहे.