महाशिवरात्रीच्या निमित्ताने मिरजेत होणार्या कीर्तन महोत्सवासाठी संकल्प !
मिरज, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – माधवराव गाडगीळ मित्र-परिवार, श्री दासबोध अभ्यास मंडळ, गीता फाऊंडेशन यांच्या वतीने २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव, नामसंकीर्तन, आरोग्य शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी ७ फेब्रुवारी या दिवशी विधीपूर्वक संकल्प करण्यात आला. याचे पौरोहित्य श्री. कुश आठवलेगुरुजी यांनी केले. संकल्पासाठी श्री. विनोदभाऊ कुलकर्णी आणि सौ. स्वाती कुलकर्णी हे दांपत्य यजमान होते. या वेळी यजमान दांपत्यासहित २५ कार्यकर्त्यांनी काशी विश्वेश्वराच्या पिंडीवर जलाभिषेक करून संकल्प सोडला.
या वेळी सनातन संस्थेच्या वतीने हिंदु धर्मावर आलेली ग्लानी दूर होऊन हिंदूंमध्ये धर्मतेज वाढावे आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्र येऊ दे यासाठी सर्वांच्याकडून प्रार्थना करवून घेण्यात आली. या प्रसंगी श्री. माधवराव गाडगीळ, सनातन संस्थेच्या सुश्री सुरेखा आचार्य, तसेच अन्य उपस्थित होते.