भारतासारख्या शक्तीशाली राष्ट्राचा मुकुट असलेला जम्मू-काश्मीर कधीपर्यंत जिहादी कारवायांमध्ये जळत रहाणार ?
१. मागील काही वर्षांपासून पाकिस्तानने जम्मू-काश्मीर सीमेवर प्रतिवर्षी शेकडो वेळा युद्धविरामाचे उल्लंघन करून आतंकवाद्यांची घुसखोरी करणे भारताला लज्जास्पद असणे
‘आज देशाचा प्रत्येक नागरिक पाकिस्तानी आणि त्याच्या छुप्या दूतांच्या (आतंकवाद्यांच्या) आक्रमणांमुळे अत्यंत दुःखी आहे. मागील काही वर्षांपासून हे जिहादी भारताचे सैन्य आणि पोलीस चौक्या यांना लक्ष्य बनवून त्यांची निःसंकोचपणे हानी करत आहेत, उदा. मागील २-३ वर्षांमध्ये मुख्य स्वरूपात दीनानगर ठाणे, गुरुदासपूर, सीमा सुरक्षा दलाची छावणी, उधमपूर, पठाणकोट येथील वायूदलाचे तळ, उरी येथील सैन्याचे मुख्यालय, जम्मूमधील नगरोटा सैन्य छावणी आणि रामगडमध्ये सीमा सुरक्षा दलावर झालेल्या आक्रमणांच्या व्यतिरिक्त जवळ जवळ प्रतिदिन या क्षेत्रांमध्ये होणार्या अन्य आतंकवादी कारवाया, सीमेवर प्रतिवर्षी शेकडो वेळा होणारे युद्धविरामाचे उल्लंघन आणि आतंकवाद्यांची घुसखोरी सुद्धा आम्हाला लज्जास्पद ठरत आली आहे.
२. ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतरही शत्रूच्या कारवाया थांबत नसल्यामुळे राष्ट्ररक्षणासाठी भारताला शत्रूंचा संपूर्ण बीमोड होईपर्यंत आक्रमक नीतीचा पुनःपुन्हा अवलंब करण्याची नितांत आवश्यक असणे
आता आपण विचार करायला पाहिजे की, २६.९.२०१६ मध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’द्वारे शत्रूंच्या ‘लॉचिंग पॅड’वर (प्रशिक्षित आतंकवाद्यांना येथे आणून नंतर भारतात घुसखोरी करण्यासाठी पाठवले जाते) आपल्या अद््भुत साहसी रणनीतीचा परिचय देणारे आमचे शूरवीर सैनिक आता कधीपर्यंत धैर्य टिकवून ठेवतील ? आज सर्जिकल स्ट्राईकच्यानंतरही पाकिस्तानी सैन्य आणि त्यांचे आतंकवादी यांच्यामध्ये भारतीय सेनेच्या या आक्रमक नीतीचे कसलेही भय राहिले नाही; म्हणूनच ते पुनःपुन्हा आपल्या क्षेत्रामध्ये अकारण आक्रमण करत रहाणार्या स्वतःच्या जिहादी नीतीमध्ये कसलेच पालट करत नाहीत. अशा स्थितीत आमचे सैनिक आणि सर्व नागरिक शत्रूच्या कुटील कारवायांना बळी पडत चालले आहेत, तर अशा शत्रूंचा प्रतिशोध घेण्यासाठी कोणत्या तरी आक्रमक नीतीचा आम्हाला पुनः अवलंब केलाच पाहिजे. जिहादी कारवाया नष्ट केल्याविना राष्ट्ररक्षण कसे होणार ?’
(साभार : साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ७ मार्च ते १३ मार्च २०१८)