केरळमधील ‘मीडियावन’ या वृत्तवाहिनीवर घातलेली बंदी योग्यच ! – केरळ उच्च न्यायालय

वृत्तवाहिनीमध्ये ‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेच्या सदस्यांची गुंतवणूक

केरळ उच्च न्यायालय

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील ‘मीडियावन’ या वृत्तवाहिनीवर घातलेली बंदी योग्यच आहे, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ‘माध्यमम ब्रॉडकास्टींग लिमिटेड’ या आस्थापनाद्वारे या वाहिनीचे संचालन केले जात होते. केंद्र सरकारने ‘मीडियावन’ वाहिनीचा परवाना रहित केला होता. याविरोधात या वाहिनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ‘माध्यमम ब्रॉडकास्टींग लिमिटेड’ या आस्थापनातील गुंतवणूकदार हे ‘जमात-ए-इस्लामी’ या इस्लामी संघटनेचे सदस्य आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केंद्र सरकारने ही बंदी घातली आहे. ३१ जानेवारीपासून या वाहिनीचे प्रसारण बंद झाले आहे.