मध्यप्रदेशातील शाळांमध्ये हिजाबवर बंदी असेल ! – शिक्षणमंत्री इंदरसिंह परमार
सर्वच राज्यांनी असा ठोस निर्णय घोषित करणे आवश्यक आहे !
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील शाळांमध्ये हिजाब घालून येण्यावर बंदी असणार आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री इंदर सिंह परमार यांनी दिली. ते म्हणाले की, शाळांमध्ये केवळ गणवेशच परिधान करून येणे बंधनकारक असणार आहे. हिजाब गणवेशाचा भाग नसेल. यासाठी शिक्षण विभाग राज्यातील सर्व शाळांचे परीक्षण करणार आहे.
कर्नाटक के बाद अब मध्यप्रदेश के स्कूलों में बैन होगा हिजाब, शिवराज सरकार के मंत्री ने किया बड़ा ऐलान#MadhyaPradesh | #HijabRow | #Hijab https://t.co/otCJVgkPXu
— Asianetnews Hindi (@AsianetNewsHN) February 8, 2022
परमार पुढे म्हणाले की, हिजाब हे सूत्र नसून गणवेश हे सूत्र आहे. समानता आणि शिस्त यांसाठी गणवेश आहे. त्यामुळे शाळांमध्ये एकसारखाच गणवेश असणार आहे. जे समुदाय यावरून बोलत आहेत, त्यांना येणार्या काळामध्ये पस्तवावे लागणार आहे. हिजाब घर आणि सार्वजनिक ठिकाणी वापरू शकता; मात्र शाळेमध्ये नाही.