वर्ष २०२१ मध्ये भारताचा चीनसमेवत विक्रमी ९ लाख २० सहस्र कोटी रुपयांच्या वस्तूंचा व्यापार !
भारताने ७ लाख २० सहस्र कोटी रुपयांच्या वस्तूंची आयात, तर केवळ २ लाख कोटी रुपयांच्या वस्तूंची निर्यात केली !
चीन भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असतांना व्यापारात मात्र भारताने चीनसमोर शरणागतीच पत्करल्याचे आकडेवारीतून लक्षात येते ! ही गुलामगिरी भारत कधी दूर करणार ? – संपादक
नवी देहली – लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात तणाव असतांनाही वर्ष २०२१ चीन भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार राहिल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. वर्ष २०२१ मध्ये भारताचा चीनसमवेतचा व्यापार विक्रमी ९ लाख २० सहस्र कोटी रुपयांवर पोचला आहे. भारताने चीनकडून ७ लाख २० सहस्र कोटी रुपयांच्या वस्तूंची आयात केली, तर चीनला केवळ २ लाख कोटी रुपयांच्या वस्तूंची निर्यात केली. यातून भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचा फारसा लाभ झालेला नाही, हे लक्षात येते.