‘महाभारत’ मालिकेतील भीमाची भूमिका करणारे प्रवीण कुमार सोबती यांचे निधन

नवी देहली – दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘महाभारत’ या मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार सोबती यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या वर्षीपासून आजारी होते. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रवीण कुमार हे हतोडा आणि थाळी फेक खेळाडू होते. त्यांनी आशियाई खेळांमध्ये २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य, अशी ४ पदके जिंकली आहेत. २ ऑलिंपिक स्पर्धेतही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. क्रीडा क्षेत्रातील उत्तम योगदानासाठी त्यांना ‘अर्जुन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी सीमा सुरक्षा दलामध्ये ‘डेप्युटी कमांडंट’ची नोकरीही केली होती. त्यांनी काही चित्रपटांमध्ये काम केले होते.