(म्हणे) ‘ जशी हिंदु महिलांची ‘मंगळसूत्र’ ही ओळख आहे, तशीच मुसलमान महिलांची ‘हिजाब’ ही ओळख आहे !’ – काँग्रेसचे खासदार टी.एन्. प्रतापन्
कर्नाटकातील महाविद्यालयांमधील हिजाबचे प्रकरण
कशाची तुलना कशाशी करावी ?, हेही न समजणारे काँग्रेसचे खासदार प्रतापन ! अशा प्रकारची तुलना करून प्रतापन् महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याचे समर्थन करू शकत नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक
देहली – जशी हिंदु महिलांसाठी ‘मंगळसूत्र’, ख्रिस्त्यांसाठी ‘क्रॉस’ आणि शिखांसाठी ‘पगडी’ अशी धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख आहे, तशीच ‘हिजाब’ ही मुसलमान महिलांची ओळख आहे, असे विधान केरळमधील काँग्रेसचे खासदार टी.एन्. प्रतापन् यांनी लोकसभेत केले.
Opposition raises Karnataka hijab issue in Lok Sabha
Where are we taking our India? We cannot lose our diversity. I request the Education Minister to intervene in this matter to ensure the constitutional rights of the students: TN Prathapan, Congress MP from Kerala pic.twitter.com/LqR51zjKrN
— ANI (@ANI) February 7, 2022
ते कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये हिजाब घालून प्रवेश देण्याच्या मुसलमान विद्यार्थिनींच्या मागणीच्या प्रश्नावर बोलत होते. या प्रकरणी शिक्षणमंत्र्यांनी हस्तक्षेप करून त्यांना घटनात्मक अधिकार दिले पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली.