‘हलाल’ केवळ एक प्रमाणपत्र नसून आर्थिक जिहाद असल्याने त्याविरुद्ध व्यापक आंदोलन उभे रहाणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’ यांच्या जळगाव विभागाकडून ‘हलाल प्रमाणपत्र’ या विषयावर ‘ऑनलाईन’ जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन !
जळगाव – ‘हलाल प्रमाणपत्र’ हे आता केवळ मांसाहारी पदार्थांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्याचा जवळपास प्रत्येक क्षेत्रात शिरकाव झालेला आहे. ‘हलाल सौंदर्यप्रसाधना’पासून ते अगदी ‘हलाल तुलसी अर्क’, ‘हलाल टाऊनशिप’पासून ते अगदी ‘हलाल टुरिझम’पर्यंत हे वाढत चालले आहे. ‘हलाल’च्या माध्यमातून इस्लामी संघटना आर्थिकदृष्ट्या पुष्कळ सक्षम होत चालल्या आहेत. त्यामुळे ‘हलाल हे केवळ एक प्रमाणपत्र आहे’, या भ्रमात हिंदूंनी न रहाता तो एक आर्थिक जिहाद आहे आणि तो थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर हिंदूंचे प्रबोधन होणे अन् संघटितपणे आंदोलन उभे रहाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.
‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशन’ (जितो) या जैन व्यावसायिकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या जळगाव विभागाने ‘हलाल प्रमाणपत्र : व्यावसायिकांसाठी भयानक संकट, एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे षड्यंत्र’, या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही संबोधित केले.
‘जितो’च्या जळगाव विभागाचे अध्यक्ष श्री. अजय ललवाणी, तसेच सचिव श्री. दर्शन टाटिया यांनी या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचा लाभ जळगावमधील अनेक जैन व्यावसायिकांनी घेतला. या वेळी श्री. शिंदे यांनी ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्थेला रोखण्यासाठी आता व्यापक जागृतीची आणि त्यासमवेत संघटितपणे शासनाकडे हलाल प्रमाणपत्र हद्दपार करण्याची मागणी लावून धरण्याची आवश्यकता आहे. जैन समाज यात मोलाचे योगदान देऊ शकेल’, असे आवाहनही केले.
हे पहा –
♦ हिन्दू जनजागृति समिति आयोजित : ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ में “हलाल सर्टिफिकेशन”
_____________________
Read this also –
♦ Why do we need a Religion based parallel Halal economy in Non-religious (Secular) India ? Boycott ‘Halal-certified’ products !- Hindu Janajagruti Samiti https://sanatanprabhat.org/english/20802.html
विविध प्रकारच्या जिहादला आर्थिक रसद पुरवण्याचे कार्य ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
आज भारतात विविध प्रकारच्या जिहादच्या माध्यमातून हिंदु समाज आणि देश यांना मोठ्या प्रमाणात हानी पोचवण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. या जिहादला आर्थिक रसद पुरवण्याचे कार्य हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे या विषयाकडे सर्व हिंदु समाजाने वेळीच गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.
व्यावसायिकांचा वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद१. हा कार्यक्रम झाल्यावर काही व्यावसायिकांनी ‘व्यापक स्तरावर एक प्रत्यक्ष कार्यक्रम घेण्यात यावा’, अशी मागणी केली, तसेच त्या कार्यक्रमाच्या आयोजनात साहाय्य करण्याचीही सिद्धता त्यांनी दर्शवली. २. राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय मंत्रीमंडळाकडे हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात निवेदन देणे आणि त्यासंदर्भात पाठपुरावा करणे, याविषयीची सिद्धताही काही व्यावसायिकांनी दर्शवली. |