बॅ. अब्दुल रहमान अंतुले यांचे पूर्वज हिंदु असणे आणि बॅ. अंतुले यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री असतांना मशिदींवर भोंगे लावण्यास अनुमती देणे !
धर्मांतर नव्हे, राष्ट्रांतर !
‘आज सर्वांसाठी डोकेदुखी ठरलेले मशिदींवर ध्वनीवर्धक बसवण्यास अनुमती देणारे बॅ. अब्दुल रहमान अंतुले मूळ करंदीकर घराण्यातील ! एकेकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले बॅ. अब्दुल रहमान अंतुले यांनी एकदा त्यांचे पूर्वज ‘कोकणातील करंदीकर घराण्यातील होते’, हे मान्य केले होते; पण त्यांच्या काळात त्यांनी अनेक गोष्टींत मुसलमान समाजाला झुकते माप दिले होते. त्यांच्याच कार्यकाळात अजान पढण्यासाठी मशिदींवर ध्वनीवर्धक बसवण्याची अनुमती देण्यात आली.
आज प्रत्येक गावातील सर्वच मशिदींवरून एकाच वेळी दिवसातून ५ वेळा कर्णकर्कश आवाजात अजानची बांग देण्यात येते. त्या वेळेस बाहेरील पटांगणात हिंदूंचे जाहीर प्रवचन, कीर्तन इत्यादी चालू असेल, तर अजान (नमाजपठण करण्यासाठीचे बोलावणे) होईपर्यंत थांबवावे लागते; कारण अजानच्या कर्कश आवाजामुळे वक्त्याचे बोलणे श्रोत्यांना काहीच ऐकू येत नाही. अनेक मुसलमान राष्ट्रांतसुद्धा ध्वनीवर्धकावरून अजानची बांग देण्यास बंदी आहे. भारतातील काही न्यायालयांनीही त्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत; पण त्याची कार्यवाही होत नाही.’
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ