१९९३ च्या मुंबई साखळी बाँबस्फोटातील सूत्रधार धर्मांधाला २९ वर्षांनी अटक !
मुंबई – १९९३ च्या मुंबई साखळी बाँबस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधार अबू बकर याला भारतीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्यांनी संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथून अटक केली आहे. मुंबईत १२ ठिकाणी झालेल्या बाँबस्फोटामध्ये २५७ जण ठार, तर ७१३ जण घायाळ झाले होते. अबू बकर हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रे आणि स्फोटक यांचे प्रशिक्षण, बाँबस्फोटात वापरलेली स्फोटके पेरणे, आर्.डी.एक्स. भारतात येणे आणि दाऊद इब्राहिमच्या दुबईतील निवासस्थानी मुंबईतील बाँबस्फोटाचा कट रचणे यात सहभागी होता. अबू बकर हा संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि पाकिस्तान येथे रहात होता. यूएईमधील भारतीय अन्वेषण यंत्रणांच्या माहितीवरून त्याला अटक करण्यात आली आहे. २०१९ मध्ये बकर याला अटक करण्यात आली होती.