विद्यापीठ चौक (पुणे) येथे काँग्रेसच्या ‘परिवर्तन रॅली’मुळे सलग ३ घंटे वाहतूक कोंडी !
पुणे – काँग्रेसच्या ‘परिवर्तन रॅली’मुळे येथील विद्यापीठ चौक आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. हा चौक ओलांडण्यासाठी अर्धा घंट्याहून अधिक वेळ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुणे दौर्याच्या निमित्ताने ५ फेब्रुवारी या दिवशी विद्यापीठ चौक ते काँग्रेस भवन या मार्गावर ‘परिवर्तन रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची गर्दी वाढल्याने एकाच बाजूने वाहतूक चालू होऊन ती मंद गतीने पुढे सरकत होती. त्यातच ‘रॅली’ चालू होण्यास विलंब झाला. त्यामुळे दुपारी २ पासून सायंकाळी ५ पर्यंत या मार्गावर कोंडी झाली होती. (नागरिकांना साहाय्य करण्याऐवजी अडचणींमध्ये भर पाडणारा काँग्रेस पक्ष ! – संपादक)