लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेतांना शाहरुख खान थुंकले ?

फुंकणे असो कि थुंकणे, हिंदूंच्या अंत्यविधीच्या वेळी स्वपंथातील कृती करण्याची काय आवश्यकता ? कुणी हिंदु मुसलमानांच्या अंत्यविधीच्या वेळी जाऊन गंगाजल शिंपडणे किंवा महामृत्यूंजय मंत्र म्हणणे अशा कृती करतात का ? – संपादक

लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेतांना अभिनेते शाहरूख खान

मुंबई – लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेतांना अभिनेते शाहरूख खान यांनी थुंकल्याप्रमाणे कृती केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या घटनेनंतर लोकांनी शाहरुख खान यांच्यावर प्रचंड प्रमाणात टीका केली. काही इस्लामी पंथाच्या अभ्यासकांनी मात्र हा आरोप खोडून काढत ‘शाहरुख खान थुंकले नाही, तर फुंकले’ असा दावा केला. ‘फुंकर मारण्याची कृती धार्मिक असल्याचेही या अभ्यासकांचे म्हणणे आहे. इस्लामनुसार ‘पार्थिवावर फुंकर मारल्यास नकारात्मक शक्ती दूर लोटल्या जातात’, असा समज आहे’, असे समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. (अशा गोष्टींना पुरोगामी किंवा निधर्मी ‘अंधश्रद्धा’ म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)

लता मंगेशकर यांच्या अंत्यविधीच्या प्रसंगी काय घडले ?

शाहरूख यांनी आधी लता मंगेशकर यांच्यासाठी ‘दुआ’ (इस्लाम पंथाप्रमाणे प्रार्थना करणे) मागितली. यानंतर ते मास्क खाली करून खाली वाकून ते काहीतरी कृती करतांना दिसले. ही कृती थुंकण्याची असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून त्यांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला प्रदक्षिणा घातली.