ओडिशा राज्यातील अपहृत मुलीची तळेगाव-दाभाडे (जिल्हा पुणे) येथून सुटका
लोणावळा (जिल्हा पुणे) – एका १७ वर्षीय मुलीचे ओडिशा राज्यातून अपहरण करण्यात आले होते. ही मुलगी तळेगाव-दाभाडे येथील नवलाख उंबरे येथे असल्याची माहिती लोणावळा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या मुलीची सुटका करून चैतन्य महिला आश्रम, मोशी या ठिकाणी सुखरूप पाठवणी केली.
या मुलीच्या अपहरणाचा गुन्हा ओडिशा येथील सिमुलीया पोलीस ठाण्यात नोंद झाला होता. त्यानुसार पोलीस तिचा शोध घेत असतांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना ती नवलाख उंबरे येथे एका खोलीत बंदीस्त असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार लोणावळा पोलिसांनी कार्यवाही केली. अपहरणाचे कारण समजू शकले नाही.