चर्चिल आलेमाव यांचा देहलीच्या आर्चबिशपकडून निषेध
तृणमूल काँग्रेसच्या आलेमाव यांच्याकडून चर्चचे बांधकाम पाडल्याचे सूत्र उपस्थित
पणजी – तृणमूल काँग्रेसचे बाणावली मतदारसंघाचे उमेदवार चर्चिल आलेमाव हे देहली येथील ‘लिटल फ्लोवर चर्च’चे बांधकाम पाडल्याच्या प्रकरणाचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहे. गोव्याच्या निवडणुकीला १० दिवस शिल्लक असतांना चर्चिल आलेमाव देहली येथील चर्चचे सूत्र उपस्थित करत आहेत. हे एक लाजिरवाणे कृत्य आहे. या प्रकरणी मी चर्चिल आलेमाव यांना निषेध करतो, असे देहली येथील आर्चबिशप कुरीयाकोसे भारानीकुलांगरा यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, वास्तविक देहली येथील चर्च पाडल्यानंतर ‘डायोसेस’ने त्वरित देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना संपर्क साधला होता. या वेळी त्यांनी आवश्यक ते सर्व सहकार्य दिले. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी चर्चचे तात्पुरते बांधकाम बांधण्यासही सहकार्य केले.