कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्ले येथील धर्मशिक्षणवर्गातील महिलांनी साजरी केली धर्मशास्त्रानुसार रथसप्तमी !
पोर्ले (तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर), ७ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या सौ. विजया वेसणेकर यांनी पोर्ले येथील धर्मशिक्षणवर्गातील महिलांना धर्मशास्त्रदृष्ट्या रथसप्तमी कशी साजरी करायची ? याचे महत्त्व सांगितले. यानुसार तेथील महिलांनी ७ फेब्रुवारी या दिवशी रथसप्तमी साजरी केली. यात सूर्याला अर्घ्य देणे, सुगडात दूध तापवून त्याचा प्रसाद करणे यांसह प्रत्येक कृती या महिलांनी भावपूर्ण केल्या. या महिलांनी केलेल्या धर्माचरणाच्या कृती पाहून गल्लीतील इतर महिलांनी या कृती विचारून घेतल्या आणि तशा केल्या.
या उपक्रमात सौ. चंद्रभागा चौगुले, सौ. स्वरूपा चौगुले, सौ. वैशाली चौगुले, श्रीमती कुमुदिनी पाटील, सौ. हेमलता चोपडे, सौ. शोभा पाटील, सौ. शीतल पाटील सहभागी झाल्या होत्या. (धर्मशास्त्र समजल्यावर त्याप्रमाणे रथसप्तमी साजरी करणार्या सर्व धर्मप्रेमी महिलांचे अभिनंदन ! – संपादक)