हवामान पालटामुळे भारताच्या किनारपट्टी भागांत पुराचा धोका वाढला ! – शास्त्रज्ञांचा अभ्यास
भारतच नव्हे, तर जगामधील हवामान पालटाला विज्ञनाचा अतिरेक कारणीभूत आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये ! विज्ञान पृथ्वीच्या अस्तित्वाच्या मुळावर आले आहे, हे तथाकथित पुरो(अधो)गामी कधी लक्षात घेणार ? – संपादक
नवी देहली – हवामानातील पालटामुळे भारताचा किनारपट्टी भाग, बंगालचा उपसागर, दक्षिण चीन समुद्र आणि दक्षिण हिंद महासागर येथे काही असामान्य पालट दिसू शकतात, असे शास्त्रज्ञांंच्या अभ्यासातून समोर आले आहे. ‘क्लायमेट डायनामिक्स’ या नियतकालिकात या अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Due to #ClimateChange some unusual activities can be seen in the coastal areas of India#ClimateCrisis #ClimateActionNow https://t.co/z7BVuzzivW
— DNA (@dna) February 7, 2022
१. या नव्या अभ्यासामुळे समुद्रकिनार्यालगतच्या शहरांना, तसेच त्या आसपास रहाणार्या लोकांना धोका आहे; कारण या भागांत आधीच पुराचा धोका आहे. समुद्राच्या लाटांच्या वाढत्या हालचालींमुळे पूर येण्याचा धोका वाढू शकतो, ज्यामध्ये भूगर्भातील खारे पाणी घुसणे, पिके नष्ट होणे आणि मानवाची सामाजिक अन् आर्थिक हानी होणे असे प्रकार होऊ शकतात. जोरदार वार्याचा भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील किनारी भागांवर अन् हिंदी महासागराच्या सीमेवरील देशांवर परिणाम होईल.
२. या अभ्यासानुसार, दक्षिण हिंदी महासागर क्षेत्रात जून ते नोव्हेंबर या मासांमध्ये अधिकाधिक जोरदार वारा वाहू शकतो. बंगालच्या उपसागरातील भागांना अधिक वार्याचा सामना करावा लागेल.