शरीरबळ, मनोबळ आणि आत्मबळ वाढवणारे सूर्यनमस्कार !
‘रथसप्तमी’ या सणामध्ये सूर्यदेवाची पूजा सांगितली आहे. ‘आरोग्यं भास्करात् इच्छेत् ।’ म्हणजे सूर्याकडून आरोग्याची कामना करावी, असे शास्त्रवचन आहे. सूर्याचे तेज आपल्या अंगी यावे म्हणून सूर्योपासना. समर्थ रामदासस्वामींनी सांगितलेले साष्टांग सूर्यनमस्कार जर नियमितपणे मुलांनी घातले, तर काय बिशाद आहे गुंडांची आक्रमण करण्याची. शरीरबळ आणि मनोबळ वाढवण्याचे सामर्थ्य या नमस्कारांत आहे. जर हे समंत्र घातले गेले, तर आत्मबळसुद्धा वाढते.
(साभार : ‘जनीमनी आयुर्वेद – सण आणि आरोग्य’, लेखक – वैद्य सुविनय दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग)