आसाम येथील श्री. अमित बर्मन यांना ‘धर्मासाठी काहीतरी करावे’, अशी इच्छा होणे आणि रामनाथी आश्रमात आल्यानंतर त्यांना आलेल्या अनुभूती
१. रामनाथी आश्रमात जातांना ‘मी धर्माच्या कार्यासाठी जात आहे, तर धर्मच माझ्या घराचे रक्षण करील’, असा मनात विचार येणे
‘मी आसाम राज्यातील धुबरी गावात रहातो. मी घरातून बाहेर पडतांना प्रत्येक वेळी माझी आई मला विचारते, ‘‘तू कुठे जात आहेस ? कशासाठी जात आहेस ?’ त्या वेळी मी तिला ‘खेळायला जात आहे’, असे खोटेच सांगतो. मी गोव्यातील रामनाथी आश्रमात जाण्यासाठी निघालो असतांना आईला सांगितले, ‘‘तेथे चांगले प्रशिक्षण देतात.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘तू गेल्यावर येथे काही अडचण निर्माण झाली, तर माझ्याकडे कोण बघणार ?’’ त्या वेळी मी आकाशाकडे पाहिले आणि मनातल्या मनात म्हणालो, ‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ (मी धर्माच्या कार्यासाठी जात आहे, तर माझ्या घराचे रक्षणही धर्मच करील.) नंतर मी आकाशाकडे पाहून गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘आता तुम्हीच सर्व पाहून घ्या.’ पूर्वी एकदा मी गुरुदेवांना विचारले होते, ‘‘आसामचे काय होणार ?’’ तेव्हा गुरुदेव मला म्हणाले, ‘‘आता तू आला आहेस, तर मला आसामची काळजी नाही.’’ तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवर थोपटले होते.
२. श्रीमद्भगवद्गीतेतील वचने ऐकून ‘धर्मासाठी काहीतरी करावे’, अशी इच्छा निर्माण होणे
तेव्हापासून मला वाटते, ‘राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे.’ माझ्या मनात पुष्कळ दिवसांपासून विचार येत होते, ‘मी पूर्णवेळ साधना कधी करणार ? पूर्णवेळ साधना करण्यासाठी घरी काय सांगायचे ?’ मी कराटे खेळत असतांना ‘हा एकच शेवटचा डाव खेळूया’, असा माझ्या मनात संघर्ष चालू असतो. ‘मी क्षत्रिय आहे. मी धर्मासाठी काही केले नाही, तर मला नरकात जावे लागेल. ‘मी क्षत्रिय आहे’, असे म्हणवून घेण्याचा मला अधिकार रहाणार नाही’, असे मनात विचार येतात. तेव्हापासून माझ्या मनात ‘धर्मासाठी काहीतरी करावे’, अशी इच्छा निर्माण झाली. त्यानंतर मी श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांना प्रार्थना केली, ‘मला आता तुम्हीच मार्ग दाखवा.’ नंतर मी साधना शिकण्यासाठी रामनाथी आश्रमात आलो.
३. अनुभूती
३ अ. नामजप करतांना माळेतून सुगंध येणे आणि त्या सुगंधाने चांगले वाटणे : मी एकदा नामजप करत होतो. तेव्हा मला छान सुगंध येत होता. मला वाटले, ‘कुणीतरी उदबत्ती लावली असेल किंवा धूप जाळला असेल.’ तेव्हा मी सर्वत्र पाहिले, तर कुठेच काही लावलेले नव्हते. नंतर ‘नामजपाच्या माळेतून सुगंध येत आहे’, असे माझ्या लक्षात आले. तो सुगंध संपूर्ण खोलीत पसरला होता. त्या वेळी मला चांगले वाटत होते.
३ आ. ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे सनातनच्या संतांना तेथील सुगंधावरून ओळखू शकेन’, असे वाटणे : मी सनातनच्या संतांकडे गेल्यावर मला प्रत्येक संतांजवळ वेगवेगळा सुगंध येतो. ‘मी डोळे बंद करून संतांकडे गेलो, तर तेथील सुगंधावरून मी त्या संतांना ओळखू शकेन’, असे मला वाटते. त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. अमित बर्मन, धुबरी, आसाम. (८.७.२०१९)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |