बनारस हिंदु विश्वविद्यालयामध्ये वैदिक गणिताच्या एक वर्षाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रारंभ
वाराणसी (उत्तरप्रदेश) – बनारस हिंदु विश्वविद्यालयामध्ये आता वैदिक गणिताचा डिप्लोमा अभ्यासक्रम प्रारंभ करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम ऑनलाईनही शिकता येणार आहे. हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असणार आहे.
या विश्वविद्यालयातील विभाग प्रमुख आणि गणितज्ञ प्रशांत शर्मा यांनी सांगितले की, वैदिक गणितामध्ये ३०४ महत्त्वाची सूत्रे आहेत. त्यांच्या माध्यमांतून अनेक न सुटलेली सूत्रे सोडवता येऊ शकतात.