महिलेच्या केसांत थुंकल्याच्या प्रकरणी केशरचनाकार जावेद हबीब यांची तोंडदेखली क्षमायाचना !

  • धर्मांधांची राष्ट्र आणि धर्म विघातक वृत्ती दर्शवणारी घटना

  • धर्मांधांची विकृत मानसिकता जाणा !

‘प्रसिद्ध केशरचनाकार जावेद हबीब यांनी एका कार्यशाळेमध्ये महिलेच्या केसात थुंकल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साथरोगाच्या कायद्याशी संबंधित कलमांच्या अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणात हस्तक्षेप केला असून त्याने उत्तरप्रदेश पोलिसांना त्या व्हिडिओची सत्यता तपासण्यास सांगितले आहे. या घटनेविषयी जावेद हबीब यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून तोंडदेखली क्षमा मागितली आहे. (गुन्हा नोंदवला नसता, तर हबीब यांनी क्षमा मागितली असती का ? – संपादक)’