साईबाबा संस्थानच्या दानपेटीत चलनातून बाद केलेल्या ३ कोटी रुपयांच्या नोटा आढळल्या
शिर्डी (जिल्हा नगर) – येथील साईबाबा संस्थानच्या दानपेटीत ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या चलनातून बाद करण्यात आलेल्या जवळजवळ ३ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आढळून आल्या आहेत. नोटाबंदीला ५ वर्षे उलटली, तरी आजही दानपेटीतील या जुन्या नोटांची आवक थांबलेली नाही.
साई मंदिराच्या दानपेटीत कोट्यवधींच्या जुन्या नोटा, चलन बदलण्यासाठी साई ट्रस्टचं RBIला साकडंhttps://t.co/OBE0K34NvJ
— News18Lokmat (@News18lokmat) February 4, 2022
‘यासाठी केंद्रीय पातळीवर अनेकदा पाठपुरावा करण्यात आला आहे; मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही़. आम्ही रिझर्व्ह बँकेच्या संपर्कात असून लवकरच तोडगा निघेल’, अशी अपेक्षा साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी व्यक्त केली आहे.