काँग्रेसच्या राज्यात भगवा ध्वज लावण्यावरही आता आडकाठी !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

‘राजस्थानच्या आमागड किल्ल्यामध्ये ‘श्रीराम’ लिहिण्यात आलेला भगवा ध्वज काँग्रेसपुरस्कृत अपक्ष आमदार रामकेश मीणा यांच्या उपस्थितीत मीणा समाजातील काही तरुणांनी फाडून फेकून दिला. (‘मीणा समाज हा भगवान श्रीविष्णूच्या मत्स्यावतारापासून निर्माण झाला आहे’, अशी नोंद आहे. श्रीराम हा तर विष्णूचा अवतार आहे; मग श्रीरामाचे चित्र असलेला भगवा ध्वज फडकावणे, यात चूक ती काय ? यामुळे इतिहासाची मोडतोड कशी काय झाली ? स्वतःची पाळेमुळे विसरून अशा प्रकारे हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे हिंदू नतद्रष्टच होत ! – संपादक)