डॉ. सुवर्णा यांची हत्या केल्यानंतर पती संदीप वाजे यांनी जाळला मृतदेह !

डॉ. सुवर्णा वाजे आणि जळलेली गाडी 

नाशिक – येथील महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या केल्यानंतर त्यांचे पती संदीप वाजे आणि त्यांचे साथीदार यांनी त्यांना गाडीसह जाळून टाकले. वाडीवर्‍हे पोलिसांनी संशयित संदीप वाजे यांना ४ फेब्रुवारी या दिवशी अटक करून इगतपुरी न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.