‘सर्वशक्तीमान ईश्वर सर्वव्यापी आहे’, अशा विचारांचे एक तरी न्यायाधीश आहेत, हे भारताला भूषणास्पद !
‘केरळ उच्च न्यायालयाने राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या वाटेत येणार्या धार्मिक स्थळांविषयीच्या याचिकेवर सुनावणी करतांना म्हटले की, सर्वशक्तीमान ईश्वर सर्वव्यापी आहे. तो पृथ्वीवर, आकाशामध्ये, खांबांमध्ये आणि युद्धाच्या मैदानात, म्हणजे सर्वत्र आहे. तो दयेचे एक रूप आहे आणि प्रकाशाच्या स्वरूपात सर्वांच्या हृदयामध्ये रहातो. राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी जर धार्मिक स्थळांवर परिणाम होणार असेल, तर देव आम्हाला क्षमा करील. परमेश्वर याचिकाकर्ते, अधिकारी आणि निर्णय घेणारे यांचे रक्षण करील. देव आमच्या समवेत आहे.’