(म्हणे) ‘श्री सरस्वतीदेवी सर्वांना ज्ञान देते, ती भेद करत नाही !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी
कर्नाटकातील महाविद्यायांतील ‘हिजाब’चे प्रकरण
|
नवी देहली – ‘विद्यार्थिनींचा हिजाब त्यांच्या शिक्षणाच्या आड आणून आपण भारतातील मुलींचे भविष्य खराब करत आहोत. श्री सरस्वतीदेवी सर्वांना ज्ञान देते, ती भेद करत नाही’, असे ट्वीट करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील सरकारी महाविद्यालयांमध्ये मुसलमान विद्यार्थिंनींना हिजाब घालून महाविद्यालयात शिक्षण देण्याचे समर्थन केले आहे. कर्नाटकातील उडुपी, कुंदापूर येथील सरकारी महाविद्यालयांमध्ये हिजाब घालून येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हिंदु विद्यार्थ्यांनी ‘आम्हाला भगवे उपरणे घालून येण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी केली आहे. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी भगवे उपरणे घालूनही येत आहेत.
By letting students’ hijab come in the way of their education, we are robbing the future of the daughters of India.
Ma Saraswati gives knowledge to all. She doesn’t differentiate. #SaraswatiPuja
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 5, 2022
कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, हा प्रकार म्हणजे या मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे. (मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी शाळा आणि महाविद्यालये यांची शिस्त गुंडाळून ठेवण्याच्या मागणीचे समर्थन करणारे काँग्रेसी नेते ! – संपादक)
(म्हणे) ‘तोकडे कपडेवाल्या आणि हिजाब घालणार्या मुलींना बंदी घालणार्यांना कोणती संस्कृती अभिप्रत आहे ?’ – जितेंद्र आव्हाड
शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये गणवेश घालून जाणे अपेक्षित असते. तसे न करता धार्मिक वेशभूषा करून प्रत्येक जाऊ लागला, तर ती शाळेची शिस्त मोडणे आहे, हे जितेंद्र आव्हाड यांना ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ? – संपादक
महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी, ‘तोकडे कपडे घातलेल्या किंवा ‘फॅशनेबल’ फाटकी जीन्स घालणार्या मुली यांना चालत नाहीत. अंगभर कपडे घालणार्या, डोक्यावरूनही हिजाब घेणार्या मुलींना हे महाविद्यालयांत बंदी घालतात. यांना अभिप्रेत असलेली संस्कृती नेमकी काय आहे ?’, असा प्रश्न विचारला आहे. भाजप म्हणते ‘बेटी बचाव, बेटी पढाव’; पण जर ती मुसलमान असेल, तर बेटी हटाव’, अशी टीकाही त्यांनी केली.
तोकडे कपडे घातलेल्या किंवा फॅशनेबल फाटकी जीन्स घालणार्या मुली यांना चालत नाहीत. अंगभर कपडे घालणाऱ्या, डोक्यावरुनही हिजाब घेणाऱ्या मुलींना हे कॉलेजात बंदी घालतात. यांना अभिप्रेत असलेली संस्कृती नेमकी काय आहे?#Karnataka
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 4, 2022