पसार आतंकवादी अबू बकर याला संयुक्त अरब अमिरात येथे अटक
|
नवी देहली – मुंबईत वर्ष १९९३ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांतील पसार आतंकवादी अबू बकर याला संयुक्त अरब अमिरात येथून अटक करण्यात आली. गेल्या २९ वर्षांपासून अन्वेषण यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. त्याच्याविरुद्ध वर्ष १९९७ मध्ये ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी करण्यात आली होती.
As per the reports, the process of Bakar’s extradition, one of India’s most wanted terrorists, has been initiated.#AbuBakar #1993MumbaiBlastshttps://t.co/LKexBDDgEL
— TIMES NOW (@TimesNow) February 5, 2022
१. भारतीय यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया चालू झाली आहे. लवकरच त्याला भारताच्या कह्यात दिले जाईल.
२. अबू बकर हा आंतरराष्ट्रीय जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याचा जवळचा साथीदार आहे. वर्ष २०१९ मध्येही अबू बकर याला संयुक्त अरब अमिरातमध्ये अटक करण्यात आली होती. त्या वेळी कागदपत्रांतील त्रुटींमुळे त्याची सुटका झाली होती.
३. अबू बकरने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण, तसेच स्फोट घडवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे पुरावे आढळले आहेत. पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरात येथे त्याचे वास्तव्य होते.