‘सायकलवर बटन दाबायचे आहे आणि पाकिस्तान बनवायचे आहे’ अशा घोषणा देणारा व्हिडिओ प्रसारित

व्हिडिओ संकलित करण्यात आल्याचा समाजवादी पक्षाचा आरोप

हे जर खरे असेल, तर हे अत्यंत धोकादायक आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी याची सतत्या पडताळली पाहिजे आणि त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक 

(टीप – सायकल हे समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे.)

कानपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीमध्ये कानपूर येथील बिठूर मतदारसंघातील समाजवादी पक्षाच्या प्रचाराचा एक व्हिडिओ प्रसारात झाला आहे. यात काही जण ‘सायकलवर बटन दाबायचे आहे आणि नवीन पाकिस्तान बनवायचे आहे’, अशा घोषणा देतांना दिसत आहेत. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.

समाजवादी पक्षाने हा व्हिडिओ संकलित (एडिट) करण्यात आल्याचा दावा केला आहे. या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार मुनींद्र शुक्ला निवडणूक लढवत आहेत.