वाहनतळासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिलेच शहर ! – महापालिका आयुक्त
मुंबई – मुंबईतील वाहनतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता ‘मुंबई पार्किंग अथॉरिटी’ नेमण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे. वाहने ठेवण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिलेच शहर असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
जिथे मोठ्या इमारतीतील वाहनतळाची जागा काही वेळेकरता खाली असेल, तेवढ्या वेळात ‘बिल्डिंग अथॉरिटी’ आणि ‘मुंबई पार्किंग अथॉरिटी’ यांच्या माध्यमातून तिथे वाहने उभी करता येणार आहेत. अशा प्रकारे वाहनतळासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.