अमेरिकेच्या कारवाईत इस्लामिक स्टेटचा प्रमुख नेता अल्-हाशिमी अल्-कुरेशी ठार

भारतात आतंकवादी कारवाया करणार्‍या जिहादी आतंकवादी संघटनांच्या प्रमुखांना भारत पाकमध्ये घुसून का ठार करत नाही ?, असा प्रश्‍न अशा घटनांवरून जनतेच्या मनात येतो, याचा सरकारने विचार केला पाहिजे ! – संपादक

इस्लामिक स्टेट आतंकवादी संघटनेचा प्रमुख आतंकवादी अबू इब्राहिम अल्-हाशिमी अल्-कुरेशी (डावीकडे) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (उजवीकडे)

वॉशिंग्टन (अमेरिका) – इस्लामिक स्टेट या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख आतंकवादी अबू इब्राहिम अल्-हाशिमी अल्-कुरेशी याला सीरियामध्ये ठार केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्वीट करून दिली. या कारवाईत ६ मुलांसह किमान १३ जण मारले गेल्याचे सांगितले जात आहे. तुर्कस्तानच्या सीमेजवळील एटमेह शहरात अमेरिकी सैन्याने ही कारवाई केली. सैनिकांनी शहरातील एका इमारतीला लक्ष्य केले, जिथे युद्धामुळे सहस्रो नागरिक विस्थापित म्हणून राहत होते.

बायडेन म्हणाले की, ३ फेब्रुवारीच्या रात्री आमचे सैन्य आतंकवाद्याला पकडण्यासाठी पोचल्याचे लक्षात येताच त्याने इमारतीमध्ये स्वतःला उडवून देण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या कुटुंबाच्या किंवा इतर लोकांच्या जिवाची पर्वा न करता कुरेशी याने या स्फोटाच्या वेळी कुटुंबातील अनेक सदस्यांना समवेत घेतले.