देशातील कारागृहांमध्ये विचाराधीन बंदीवानांच्या संख्येत वाढ !
कारागृहातील विचारधीन बंदीवानांच्या संख्येत वाढ याचा अर्थ एकतर त्यांच्यावर कारवाई होत आहे किंवा त्यांच्यावर खटला चालवण्यात दिरंगाई केली जात आहे !
नवी देहली – देशातील कारागृहांमध्ये खटला चालू न झालेल्या, म्हणजेच विचाराधीन बंदीवानांच्या संख्येत वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या कारागृहाविषयीच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालात म्हटले आहे की, वर्ष २०१५ मध्ये देशातील कारागृहांमध्ये विचाराधीन बंदीवानांची संख्या ४ लाख १३ सहस्र इतकी होती, ती वर्ष २०२० मध्ये ४ लाख ३८ सहस्र इतकी झाली आहे. ही वाढ १७.१ टक्के आहे.
उत्तरप्रदेशातील कारागृहात सर्वाधिक बंदीवान
या अहवालानुसार वर्ष २०२० मध्ये उत्तरप्रदेशातील कारागृहांत सर्वाधिक, म्हणजे १ लाख ६ सहस्र, बिहारच्या कारागृहांत ५१ सहस्र ८४९, मध्यप्रदेशात ४५ सहस्र ४५६ बंदीवान होते. देशातील कारागृहातील एकूण बंदीवानांपैकी २२ टक्के बंदीवान केवळ उत्तरप्रदेशातील कारागृहांमध्येच आहेत. बिहारमध्ये १०.७ टक्के, तर मध्यप्रदेशात ९.४ टक्के आहेत.