टिपू सुलतानच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा नोंद करा !
धर्मांध ‘एम्.आय.एम्.’ पक्षाची इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे निदर्शने आणि मागणी
क्रूरकर्मा असला, तरी धर्मांध हे नेहमीच धर्मांधांच्या पाठीशी उभे रहातात, हेच यावरून लक्षात येते ! – संपादक
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), ३ फेब्रुवारी (वार्ता.) – टिपू सुलतान हिंदुविरोधी होते, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. टिपू सुलतान याच्या विरोधात चुकीचे वक्तव्य करून फडणवीस यांनी मुसलमान समाज आणि इतिहासकार यांच्या भावना दुखावल्या आहेत.
ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, तो देशगौरव होऊ शकत नाही.
त्याचे नाव मैदानाला देणे सर्वथा गैर आहे.
आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही.
हा निर्णय रद्द झाला पाहिजे.
नागपूर येथे माध्यमांशी संवाद…#maharashtra pic.twitter.com/Q6mdpFnnbt— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 26, 2022
त्यांच्या वक्तव्यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यावर विशेष कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करावा, अशी मागणी धर्मांधांचा पक्ष ‘एम्.आय.एम्.’च्या वतीने निदर्शने करून करण्यात आली. (लाखो हिंदूंचे धर्मांतर करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानने दक्षिण भारतातील ८ सहस्रांपेक्षा अधिक हिंदूंची मंदिरे पाडली. टिपूच्या अत्याचारी राजवटीत हिंदु तरुण मुलींचा अमानुष छळ करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. अशा अत्याचारी टिपूची वस्तूस्थिती मांडणे हे चूक ते काय ? त्यामुळे इथे ‘चोर तो चोर आणि वर शिरजोर’ अशी भूमिका घेणार्या ‘एम्.आय.एम्.’ पक्षावरच शासनाने कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक)