शिक्षक पात्रता परीक्षा प्रकरणी पुणे पोलिसांनी तत्कालीन उपसचिवांना अटक केली !

शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर

पुणे – ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) अपव्यवहारात पुणे पोलिसांच्या सायबर सेलने शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सायबर पोलिसांनी राज्य शिक्षण परिषदेतील सर्व पत्रव्यवहार कह्यात घेतला आहे. त्यात वर्ष २०२१ मध्ये विभागीय कार्यालयांना पाठवलेले एक पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. ‘टीईटी’चा वर्ष २०१९-२० च्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर एका वर्षाने शिक्षण परिषदेने २८४ जणांना पात्र ठरवून त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी विभागीय कार्यालयांना पत्र पाठवल्याचे अन्वेषणात समोर आले आहे.