नैसर्गिक आपत्तीत सांगलीतील लेखापालांचे कार्य उत्कृष्ट ! – मनीष गाडिया, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया
सांगली, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – व्यावसायिक निपुणतेसमवेतच सांगलीतील लेखापाल यांनी सामाजिक भान जपून कोरोना महामारी आणि महापूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी उत्कृष्ट कार्य केले आहे, असे प्रतिपादन ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया’च्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष मनीष गाडिया यांनी केले. गाडिया यांनी सांगलीतील लेखापाल शाखेला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
शाखेचे अध्यक्ष महेश यांनी शाखेच्या ३ वर्षांतील कामांचा आढावा सादर केला. राज्य ‘जी.एस्.टी.’ उपायुक्त सुनील करुगडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी उपाध्यक्ष उमेश माळी, श्रेयस शहा, मनीष आहुजा, नीलेश पाटील, राहुल पाटील, कुशल खंडेलवाल, ज्ञानेश पुसाळकर आणि श्रीधर शिंदे उपस्थित होते.