साधकांची प्रज्ञा जागृत करून त्यांना आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
दर्शनाची ओढ मज नयनांना लागली ।
‘१०.५.२०२० या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ची संगणकीय प्रत (‘पी.डी.एफ्’) वाचतांना ‘जणू परात्पर गुरुमाऊलींची दर्शन पुस्तिका हाताळत आहे’, असे मला सतत वाटत होते. ‘प्रत्येक ओळीतून आनंद जाणवून जणू डोळ्यांच्या माध्यमातून तो हृदयापर्यंत पोचत आहे’, असे वाटत होते.
दर्शनाची ओढ मज नयनांना लागली ।
जन्मोत्सवाची वेळ तासांवर राहिली ।। १ ।।
कोणते रूप असेल ते ? कसे बरे दिसेल ते ? ।
कल्पनाच भावरूपी अंतरात वाहिली ।। २ ।।
काही नाही मजपाशी सारे काही तुजपाशी ।
‘मी’मध्ये माखलेल्या जिवाची हाक ऐकिली ।। ३ ।।
– श्री. रोहन रवींद्र पातेने, मालाड, मुंबई. (१०.५.२०२०)
दर्शन दे रे, दे रे भगवंता ।
‘१३.५.२०२० या दिवशी गुरुदेवांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रक्षेपणाची सेवा करत होतो. ‘या सोहळ्याद्वारे गुरुदेवांचे कधी एकदा दर्शन घेतो ?’, असे वाटत होते. त्या वेळी पुढील कविता उत्स्फूर्तपणे स्फुरली.
दर्शन दे रे, दे रे भगवंता ।
सगुण रूप आता दाविसी जयंता ।। १ ।।
आकाशवाणी सद्गुरु दयेची ।
मने तृप्त झाली सर्व साधकांची ।
काय रूप घेसी, ओढ हीच आता ।। २ ।।
पायघड्या घालू का रांगोळ्या काढू ।
फाटकी ही झोळी माझी काय तुला वाढू ।
झोपडीत माझ्या कुठे ठेवू नाथा ।। ३ ।।
कृष्ण तूची माझा, मी तुझा सुदामा ।
वैकुंठ सोडूनी ये तू माझ्या धामा ।
भक्तीरूपी पोहे तू खाशील ना कान्हा ।। ४ ।।
तूची सुचवले, तूची लिहिले, अर्पण तूची केले, कृतज्ञता !’
– गुरुचरणी,
श्री. रोहन रवींद्र पातेने, मालाड, मुंबई. (१३.५.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |