(म्हणे) ‘प्रार्थनास्थळामध्ये चपला घालून प्रवेश करणार्या संघाच्या लोकांवर कठोर कारवाई करावी !’ – एम्.आय.एम्.
|
|
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील शहर रेल्वेस्थानकावरील प्रार्थनास्थळामध्ये संघाच्या लोकांनी चपला घालून प्रवेश केला. त्यामुळे भारतातील समस्त मुसलमान बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. तसेच त्यांना या प्रार्थनास्थळामध्ये प्रवेश करण्यापासून येथील पोलीस आणि रेल्वे प्रशासन थांबवू शकले नाही, हे अतिशय खेदजनक आहे. जर हिंदु-मुसलमान बंधूभाव कायम रहावा, असे सरकारला वाटत असेल, तर गृहमंत्र्यांनी त्वरित या कार्यकर्त्यांना अटक करण्याचा आदेश द्यावा आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. असे झाले नाही, तर संपूर्ण भारतभर तणाव निर्माण होईल आणि त्याला गृहमंत्री उत्तरदायी राहील, अशी चेतावणी ऑल इंडिया मजलिस-ई-इत्तेहादूल मुस्लीमीन’ने (एम्.आय.एम्.ने) दिली.
सौजन्य: The Ancient Times
बेंगळुरू येथील दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ५ मध्ये हमालांच्या विश्रांतीकक्षाचे प्रार्थनास्थळात रूपांतर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांनी त्याची पहाणी करून रेल्वेस्थानकाच्या कार्यकारी अधिकार्यांना निवेदन दिले. त्यावर एम्.आय.एम्.ने आक्षेप घेतला आहे.