चीनमधील हिवाळी ऑलिंपिकमध्ये मशालवाहक म्हणून गलवान संघर्षातील सैन्याधिकारी
‘पडलो तरी नाक वर‘ अशाच मानसिकतेचा चीन ! यातून चीन गलवान संघर्षातील त्याच्या सैन्याधिकार्यांना महत्त्व देतो, असा भारताला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात येते ! – संपादक
नवी देहली – चीनमध्ये चालू झालेल्या हिवाळी ऑलिंपिकमध्ये चीन सैन्याचे रेजिमेंट कमांडर क्यूई फैबाओ हे मशालवाहक म्हणून दिसून आले. चीनच्या सरकारी ‘ग्लोबल टाइम्स’ वृत्तपत्रानेच याविषयीचे वृत्त दिले आहे. गलवान खोर्यामध्ये भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य यांच्यात झालेल्या संघर्षांच्या वेळी फैबाओ यांच्या डोक्याला दुखापत झाली होती.
China’s PLA regimental commander, who had suffered severe injuries during the Galwan clash, was made the torchbearer at #Beijing2022WinterOlympics Torch Relayhttps://t.co/humhjG5ew3
— Zee News English (@ZeeNewsEnglish) February 3, 2022
भारत हिवाळी ऑलिंपिंकच्या शुभारंभ आणि समारोप या कार्यक्रमांवर बहिष्कार घालणार
या ऑलिंपिकवर अमेरिका आणि युरोपातील काही राष्ट्रे यांनी आधीच बहिष्कार घातला आहे. भारताने या स्पर्धेसाठी त्याचा एकच खेळाडू पाठवला आहे. अशा वेळी भारताने या स्पर्धेवरच बहिष्कार घालून चीनचा विरोध करणे अपेक्षित आहे ! – संपादक
चीनच्या या कृत्यावर भारताकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले की, गलवान प्रकरणी चीन राजकारण करत आहे. भारताचे चीनमधील राजनैतिक अधिकारी हिवाळी ऑलिंपिकचा प्रारंभ आणि समारोप यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालतील. ते दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित रहाणार नाहीत.
MEA said that India’s chargé d’affaires in the Beijing embassy will not be attending the opening or closing ceremony of the 2022 Winter Olympics.#ChinaHumiliatedhttps://t.co/OIZKvevlhY
— TIMES NOW (@TimesNow) February 3, 2022