वर्ष २०१६ ते २०२० या कालावधीत २० लाख बनावट नोटा जप्त

  • इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात बनावट नोटा सापडतात, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! – संपादक
  • भारतामध्ये पाकमधून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा येतात, हे ठाऊक असतांना पाकवर आतापर्यंत कोणतीही कारवाई न करणारे सर्वपक्षीय शासनकर्तेच याला उत्तरदायी आहेत ! – संपादक

नवी देहली – वर्ष २०१६ ते २०२० या ५ वर्षांत देशात निरनिराळ्या मूल्याच्या २० लाखांहून अधिक बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली.

राय यांनी सांगितले की, २ सहस्र रुपये मूल्याच्या ४ लाख ६७ सहस्र ३४६ बनावट नोटा, बंदी घालण्यात आलेल्या १ सहस्र रुपये मूल्याच्या ५ लाख २२ सहस्र ३८१ आणि ५०० रुपयांच्या २ लाख ९७ सहस्र ३७२ नोटा या ५ वर्षांच्या कालावधीत पकडण्यात आल्या. याच काळात २०० रुपये मूल्याच्या ४३ सहस्र ४०६ आणि १०० रुपये मूल्याच्या ३ लाख ४३ सहस्र ४८३ बनावट नोटाही जप्त करण्यात आल्या.