प्रयागराज येथे राज्याच्या मंत्र्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणाला अटक  

मंत्री सिद्धार्थनाथ सिंह

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास जात असतांना राज्यातील मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांच्यावर एका तरुणाने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून विष आणि ब्लेड जप्त केले. ‘हा तरुण भाजपचा माजी कार्यकर्ता असून त्याला पक्षातून काढून टाकण्यात आले आहे’, असे सांगण्यात येत आहे.