पाक-चीन यांच्याविषयी राहुल गांधी यांच्या विधानाचे समर्थन करत नाही ! – अमेरिकेची स्पष्टोक्ती
राहुल गांधी यांनी भारत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे चीन आणि पाक एकत्र आल्याची टीका केल्याचे प्रकरण
पाक आणि चीन जवळ येण्यास भाजप सरकारला उत्तरदायी ठरवून राहुल गांधी यांनी स्वतःचे हसे करून घेतले आहे. यातून गांधी यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते. अमेरिकेच्या वक्तव्यातूनही हेच लक्षात येते ! – संपादक
वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकिस्तान आणि चीन यांमध्ये कसे नाते आहे, यावर त्या दोन्ही देशांनीच भाष्य करावे; पण आम्ही नक्कीच याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत नाही, अशा शब्दांत अमेरिकेने काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केलेले विधान नाकारले आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण करतांना ‘चीन आणि पाकिस्तान यांना भारताच्या विरोधात एकत्र येऊ देण्याची घोडचूक केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाने केली आहे. भाजप देशाच्या सुरक्षेशी खेळत आहे. नागरिकांना धोक्याच्या खाईत लोटत आहे’, अशी टीका केली होती. यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांना वरील प्रतिक्रिया दिली.
#US reacts over #RahulGandhi‘s ‘#China, #Pakistan closer due to #PMModi‘s policies’ remark in Parliamenthttps://t.co/uW9orS44y9
— India TV (@indiatvnews) February 3, 2022