पिंपरी-चिंचवडमध्ये (जिल्हा पुणे) ३०० कोटींच्या ‘क्रिप्टो करन्सी’साठी पोलिसानेच केले अपहरण !
‘क्रिप्टो करन्सी’ म्हणजे आभासी चलन
जनतेचे रक्षण करणार्या पोलिसांनीच अपहरण करणे यांसारखी लज्जास्पद गोष्ट कोणती ? असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने शासनाने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा करावी, ही अपेक्षा !
पिंपरी (जिल्हा पुणे) – येथील पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या दिलीप खंदारे या पोलीस कर्मचार्याने ३०० कोटींच्या ‘क्रिप्टो करन्सी’ आणि ८ लाख रुपयांच्या खंडणीसाठी विनय नावाच्या व्यक्तीचे अपहरण केले होते; परंतु आपल्या मागावर पोलीस असल्याचे समजताच अपहरण केलेल्या व्यक्तीला काही घंट्यांनी सोडून देण्यात आले. या प्रकरणी वाकड पोलिसांनी मुख्य आरोपी दिलीप खंदारेसह एकूण ८ जणांना अटक केली आहे. यातील बहुतांश आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.
धक्कादायक! 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण, पोलीस शिपाई मास्टरमाईंड#Police #Cryptocurrency #Bitcoinhttps://t.co/yPD4A2j3MG
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 2, 2022
दिलीप खंदारे पूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयात सायबर क्राईमला होते. तेव्हाच अपहरण केलेल्या विनयकडे ३०० कोटी रुपयांची ‘क्रिप्टो करन्सी’ असल्याचे त्यांना ठाऊक होते.