सांगली येथील ‘ओम गणेश सार्वजनिक गणपति ट्रस्ट’ यांच्या वतीने गणेश जयंतीच्या निमित्ताने कीर्तन महोत्सवाचे आयोजन !
सांगली, २ फेब्रुवारी (वार्ता.) – सांगली येथील ‘ओम गणेश सार्वजनिक गणपति ट्रस्ट’ यांच्या वतीने गणेश जयंतीच्या निमित्ताने भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १ फेब्रुवारीपासून हा महोत्सव प्रारंभ झाला असून तो ४ फेब्रुवारीअखेर चालणार आहे. ३ फेब्रुवारीच्या रात्री ७ ते ९ या वेळेत पंढरपूर येथील ह.भ.प. श्रीगुरु चैतन्य एकनाथ वासकर महाराज यांचे, तर ४ फेब्रुवारी या दिवशी सांगली येथील ह.भ.प. विजय मधुकर म्हैसकर यांचे श्री गणेश जयंतीचे कीर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे. हा महोत्सव चांदणी चौक येथे होत आहे. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. लक्ष्मणभाऊ नवलाई यांनी केले आहे.