सांगली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमध्ये शिथिलता ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी
सांगली, २ फेब्रुवारी (वार्ता.) – सांगली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असून अंत्यसंस्कारांना उपस्थित रहाणार्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा नसेल, तसेच रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी रहित केली आहे, असे आदेश सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी निर्गमित केले आहेत.
अन्य गोष्टी
१. स्थानिक प्राधिकरणांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार बगीचा, उद्याने खुली रहातील.
२. भजन आणि इतर सर्व स्थानिक, सांस्कृतिक आणि लोक करमणुकीच्या कार्यक्रमांना सभागृह / मंडप यांच्या ५० टक्के क्षमतेसह अनुमती असेल.
३. विवाह समारंभास खुल्या मैदानात अगर बंदिस्त सभागृहाच्या क्षमतेच्या २५ टक्के व्यक्तीमर्यादा अथवा २०० व्यक्तींना उपस्थित रहाण्यास अनुमती देण्यात आली आहे.
४. आठवडी बाजारांना स्थानिक प्राधिकरणाच्या अटींनुसार अनुमती.