मालवण येथे पौष अमावास्येनिमित्त पवित्र स्नानाचा सहस्रो भाविकांनी घेतला लाभ !
मालवण – १ फेब्रुवारी या दिवशी सकाळी असलेल्या महोदय पर्वानिमित्त येथील समुद्रकिनारी असलेल्या ऐतिहासिक मोरयाचा धोंडा येथे समुद्रस्नानासाठी विविध ग्रामदेवता आल्या होत्या, तसेच पवित्र स्नानासाठी भाविकांचा जनसागर लोटला होता. ढोलताशांच्या गजरात आणि देवतांच्या जयघोषाने येथील परिसर दुमदुमून गेला होता. १ फेब्रुवारीला पौष अमावास्येच्या दिवशी ३ वर्षांनी आलेल्या महोदय पर्वणी योगावर तीर्थस्नानाला महत्त्व असते.