सुपर मार्केटमध्ये वाईन विकणे हा चिंताजनक विषय नाही ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
गावोगावी महिला दारूची दुकाने बंद करण्यासाठी मोर्चे आणि आंदोलने करून निवेदने देत आहेत. लाखोंचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होत असतांना दारू अशा प्रकारे सहजपणे उपलब्ध करून देणे म्हणजे जनतेला दारू पिण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन दिल्याप्रमाणे आहे, असेच जनतेला वाटते !
मुंबई – राज्यातील द्राक्ष बागायतदारासह वाइन उद्योगास चालना देण्यासाठी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीस अनुमती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे सांगून याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘हा काही चिंताजनक विषय नाही; परंतु काही जणांना वाटत असेल, तर त्यासंबंधी राज्य सरकारने वेगळा दृष्टीकोन स्वीकारला, तर त्याच्यात फारसे वावगे होणार नाही.
सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीसंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले “हा चिंताजनक विषय…”https://t.co/kIPtI0RTv0 < येथे वाचा सविस्तर वृत्त #Maharashtra #SuperMarket #Wine #SharadPawar #NCP @PawarSpeaks @NCPspeaks pic.twitter.com/NpnRt9kfSw
— LoksattaLive (@LoksattaLive) February 2, 2022
वाईन तसेच इतर मद्य यांमधील भेद समजून न घेता त्याला विरोध असेल, तर सरकारने या सगळ्या गोष्टीसंदर्भात वेगळा विचार केला, तरी माझा विरोध असण्याचे कारण नाही’, असेही पवार पुढे म्हणाले.