आम्हाला इच्छामरणाची अनुमती द्या !
|
महाविद्यालयाला अनुमती नसतांना ते कसे चालवले जात होते आणि विद्यार्थ्यांना कसे शिकवले जात होते, याची चौकशी राज्यातील भाजप सरकारने केली पाहिजे. या प्रकरणी महंमद इकबाल यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक झाली पाहिजे ! – संपादक |
सहारनपूर (उत्तरप्रदेश) – ग्लोकल वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींकडे ‘इच्छामरणासाठी अनुमती द्यावी’, अशी विनंती केली आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत; मात्र आजतागायत या महाविद्यालयाला मान्यता मिळालेली नाही. कुठूनही न्याय मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शहर दंडाधिकार्यांकडे राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देत इच्छामरणासाठी अनुमती देण्याची मागणी केली. ‘मान्यता नसतांना अंधारात ठेवून लाखो रुपयांचे शुल्क वसूल करण्यात आले’, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. सहारनपूर जिल्ह्यातील बहुजन समाज पक्षाचे विधान परिषदेतील आमदार आणि खाण व्यावसायिक महंमद इक्बाल यांचे हे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षणासाठी ३० ते ३५ लाख रुपये खर्च झाले आहेत.
मेडिकल कॉलेज के 12 छात्रों ने राष्ट्रपति से इच्छा मृत्यु की मांग की है, जानें वजहhttps://t.co/L7YQNVKoou
— Hindustan (@Live_Hindustan) February 2, 2022