भारतीय कायद्याचे पालन करा, अथवा गाशा गुंडाळा ! – आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची ट्विटरला चेतावणी
न्यायव्यवस्थेच्या विरोधातील मजकूर मागे घेण्याच्या आदेशाचे पालन न केल्याचा परिणाम !
भारतात व्यवसाय करून भारतीय न्यायव्यस्थेच्या विरोधात बोलणार्या विदेशी आस्थापनांना भारतातून हद्दपार करणेच आवश्यक ! – संपादक
अमरावती (आंध्रप्रदेश) – ‘भारतीय कायद्याचे पालन करा अन्यथा भारतातून गाशा गुंडाळा’, अशी चेतावणी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ट्विटरला दिला आहे. न्यायव्यवस्थेच्या विरोधातील अपमानास्पद मजकूर मागे घेण्याच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे उच्च न्यायालयाचा ही चेतावणी दिली आहे.
Follow Indian law or pack up: Andhra HC to Twitter on not withdrawing abusive content #news #dailyhunt https://t.co/OpcoUiegbP
— Dailyhunt (@DailyhuntApp) February 1, 2022
न्यायालयाने म्हटले, ‘ट्विटर भारतीय कायद्याशी लपूनछपून खेळ खेळू शकत नाही. भारतात काम करायचे असल्यास देशाच्या कायद्याचे पालन केले पाहिजे.’