ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांचे राज्य सरकारविरोधात दंडवत-दंडुका आंदोलन !

ह.भ.प. बंडातात्या कराडकर

सातारा, १ फेब्रुवारी (वार्ता.) – व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. ३ फेब्रुवारी या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे राज्य सरकार विरोधात हातात १ मीटरची काठी घेऊन दंडवत-दंडुका आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी दिली.

ह.भ.प. बंडातात्या कराडकर म्हणाले, ‘‘राज्य सरकारने किराणा दुकान आणि सुपर मार्केट येथे वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे, तसेच महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करणारा आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सातारा शहरातील शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी निषेध फेरी काढून आंदोलन करण्यात येणार आहे. समस्त जनहितदक्ष नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे.